Akola News: Aaple Sarkar Seva Kendra to be launched in 61 villages 
अकोला

६१ गावांमध्ये सुरू होणार ‘आपले सरकार सेवा केंद्र’

सकाळ वृत्तसेेवा

वाशीम  : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नस कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी कॉमन सर्व्हीस सेंटर योजना जिल्ह्यात राबविली जात आहे.

त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील ६१ रिक्त ठिकाणाकरिता २ ते ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

अर्जांचा नमुना, आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाच्या गावांची यादी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र, अपात्र उमेदवारांची यादी, निवड यादी तसेच निवड प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सेतू समिती कार्यालयातून अर्ज प्राप्त करून घेता येईल.

अर्जासोबत हे आवश्‍यक
अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, केंद्राच्या ठिकाणाची सन २०१९-२० ची कर पावती, केंद्र भाडे तत्वावर असल्यास त्या जागेची कर पावती तसेच तालुका दंडाधिकारी यांनी साक्षांकित केलेले करारपत्र, संगणकीय प्रमाणपत्र, इयत्ता १२ वी अथवा त्यापुढील शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) धारक असल्यास त्यासंबंधिचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असावा.

अर्जदाराला हे बंधनकारक
शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र सुरू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकरणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावलीचा योग्य वापर, संरक्षण व जतन करणे अर्जदारांना बंधनकारक राहील.


...तरच अर्ज राहिल ग्राह्य
आपले सरकार सेवा केंद्र अधिसूचित ठिकाणीच चालवणे क्रमप्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास केंद्र रद्द करण्यात येईल. एक व्यक्ती फक्त एकाच केंद्रासाठी अर्ज करू शकतात. अगोदरपासून आपले सरकार सेवा केंद्र असेल त्यांचा अर्ज ग्राह्य धरता येणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT